Brothers Killed Their Father: उत्तर प्रदेशातून अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन भावांनी मिळून त्यांच्या वडिलांचा गळा दाबून खून केला. हे प्रकरण खूप धक्कादायक आहे कारण वडिलांना मारण्यापूर्वी दोन्ही भावांनी YouTube वर 'वडिलांच्या हत्येनंतर मालमत्ता मुलांच्या नावावर कशी हस्तांतरित होते' हा व्हिडिओ सुमारे सात वेळा पाहिला होता. यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, दोन्ही भावांनी 1 एप्रिलच्या रात्री त्यांच्या वडिलांना मादक गोळ्या दिल्या. त्यानंतर दोघांनी मिळून बहिणीच्या स्कार्फचा वापर करून वडिलांचा गळा दाबून खून केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपी मुलांना अटक केली आहे.
मालमत्तेसाठी दोन भावांनी केली वडिलांची हत्या -
एसएसपी श्लोक कुमार यांनी सांगितले की, मृत सत्यवीरला दारू पिणे, जुगार खेळणे आणि सट्टेबाजीचे व्यसन होते. मृत व्यक्तीच्या नावावर 38 बिघा जमीन होती. मृताच्या दोन्ही मुलांना वाटले की, त्यांचे वडील सत्यवीर त्यांची जमीन विकतील. या कारणास्तव, मृताच्या दोन्ही मुलांनी त्यांचे वडील सत्यवीर यांना मारण्याची योजना आखली.
हेही वाचा - लातूरमध्ये 17 कोटींचं ड्रग्ज सापडलं; प्रकरणात पोलिसाचा सहभाग उघड
स्कार्फने आवळला वडिलांचा गळा -
दरम्यान, 1 एप्रिलच्या रात्री, जेव्हा सत्यवीर दारू पिऊन घरी आला, तेव्हा प्लाननुसार, मृताचा मोठा मुलगा इंद्रजित याने त्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. जेव्हा सत्यवीर झोपी गेला तेव्हा मृताचे दोन्ही मुलगे इंद्रजित आणि जॅकी यांनी वडिलांचा स्कार्फने गळा दाबून खून केला. तसेच दोघांनी वडिलांचा मृतदेह मोटारसायकलवर नेला आणि घरापासून 500 मीटर अंतरावर गावातील मंदिराजवळ बांधल्या जाणाऱ्या रिकाम्या जागेत फेकून दिला.
हेही वाचा - अकोल्यात 'हिट अँड रन' प्रकरण; कार चालकाने सहा दुचाकींना उडवलं
चौकशीदरम्यान उघड झाले की, सतवीर दारू पिऊन आपल्या मुलीचा विनयभंग करायचा, ज्यामुळे दोन्ही मुले नाराज होती. या सर्व कारणांमुळे दोन्ही मुलगे काळजीत होते. ही घटना घडवल्यानंतर, काकोड पोलीस स्टेशन परिसरातील धानोरा गावातील रहिवासी असलेल्या मृत सत्यवीर सिंग यांचा मुलगा इंद्रजित याने पोलिसांना सांगितले की, 1 एप्रिलच्या रात्री त्याचे वडील सत्यवीर शेतात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह गावातील मंदिराजवळ आढळला. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर मृतांच्या मुलांनी खळबळजनक खुलासा केला आणि वडिलांच्या मृत्यूची कबूली दिली.