Former BJP MLA Faqir Mohammad Khan
Edited Image
BJP leader Faqir Mohammad Khan: जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुरेझ येथील माजी भाजप आमदार फकीर मोहम्मद खान यांनी आत्महत्या केली. त्यांनी स्वतःच्या घरात स्वतःवर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. भाजपचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, खान यांचा मृत्यू आत्महत्याने झाला. त्यांनी हे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा - Encounter in Bijapur: विजापूर आणि कांकेर जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 22 नक्षलवादी ठार
सरकारी बंगल्यात रक्ताच्या थारोळ्यात आढळला माजी आमदाराचा मृतदेह -
फकीर मोहम्मद यांची गणना जम्मू-काश्मीर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये केली जात होती. श्रीनगरमधील उच्च सुरक्षा क्षेत्र असलेल्या तुलसीबागमध्ये त्यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्यात त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, क्वार्टर क्रमांक 9A मध्ये त्यांनी एका पीएसओच्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडली. त्यांचा मृतदेह सरकारी बंगल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.
हेही वाचा - Bill Gates Meets JP Nadda: बिल गेट्स यांनी घेतली जेपी नड्डा यांची भेट; आरोग्य आणि तंत्रज्ञानाबद्दल केली चर्चा
भाजपच्या तिकीटावर लढवली गुरेझ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक -
दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर गुरेझ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ही जागा राखीव आहे. या जागेवर नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार नजीर अहमद खान विजयी झाले होते. तर फकीर मोहम्मद खान दुसऱ्या स्थानावर राहिले. या जागेवरून नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार नजीर अहमद खान यांना 8378 मते मिळाली तर मोहम्मद खान यांना 7246 मते मिळाली.