भारतीय लष्कराला अमेरिकेकडून तीन अपाचे हेलिकॉप्टरची पहिली तुकडी मिळाली. यामुळे सैन्याच्या हल्ल्याच्या आणि ऑपरेशनल क्षमतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर पाकिस्तानच्या पश्चिम सीमेजवळील जोधपूरमध्ये तैनात केले जातील. हे हेलिकॉप्टर सर्व प्रकारच्या हवामानात उड्डाण करू शकते.
भारतीय लष्कराला अपाचे हेलिकॉप्टर मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे हेलिकॉप्टर जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टरपैकी एक आहेत. भारतीय हवाई दलाकडे आधीच 22 हेवी अटॅक हेलिकॉप्टर आहेत. अपाचे हेलिकॉप्टरना 'एअर टँक' म्हणतात. भारतातील अपाचे हेलिकॉप्टरचे पहिले फोटो शेअर करताना भारतीय लष्कराने म्हटले आहे की, "भारतीय लष्करासाठी एक महत्त्वाचा क्षण, कारण आज लष्करासाठी अपाचे हेलिकॉप्टरची पहिली तुकडी भारतात आली आहे. हे अत्याधुनिक प्लॅटफॉर्म भारतीय लष्कराच्या ऑपरेशनल क्षमतांना बळकटी देतील."