Sunday, August 17, 2025 05:11:21 PM

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर पुन्हा पर्यटकांनी गजबजलं

काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र आता याच पार्श्वभूमीवर काश्मीर पर्यटकांनी पुन्हा एकदा पाहायला मिळतंय.

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर पुन्हा पर्यटकांनी गजबजलं

काश्मीर: काश्मीरच्या शांत डोंगरदऱ्यांमध्ये पर्यटकांसाठी स्वर्ग मानल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला  घडलेला दहशतवादी हल्ला संपूर्ण देशाला हादरवून गेला. ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन परिसरात अतिरेक्यांनी अचानक गोळीबार करत पर्यटकांना लक्ष्य केले. 

या हल्ल्याने काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र आता याच पार्श्वभूमीवर काश्मीर पर्यटकांनी पुन्हा एकदा गजबजल्याचं चित्र पाहायला मिळतंय. काश्मीर गुलमर्गमध्ये शुक्रवारी उत्तर काश्मीरमधील रमणीय गुलमर्ग येथील गोंडोलावर राईड करण्यासाठी, तिकिटे मिळविण्यासाठी पर्यटकांनी भल्या मोठ्या रांगा लावल्या आहेत. जय महाराष्ट्रच्या विशेष प्रतिनिधींनी या बातमीचा आढावा घेतला आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, हल्लेखोरांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात काही विदेशी पर्यटकांसह महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत.


सम्बन्धित सामग्री