Friday, August 08, 2025 01:47:48 PM

अयोध्येत नाही तर तामिळनाडूमधील 'या' मंदिरात करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजा

रामनवमीच्या निमित्ताने तामिळनाडू येथे 8 हजार 300 कोटी रुपयांच्या विविध योजनांचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विविध योजनांचा शुभारंभ करण्यापूर्वी ते एका मंदिरात पूजा करणार आहे.

अयोध्येत नाही तर तामिळनाडूमधील या मंदिरात करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजा

चेन्नई: रविवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्याहून येत असून श्रीलंका ते थेट तामिळनाडू येथे जाणार आहेत. रामनवमीच्या निमित्ताने तामिळनाडू येथे 8 हजार 300 कोटी रुपयांच्या विविध योजनांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विविध योजनांचा शुभारंभ करण्यापूर्वी ते एका मंदिरात पूजा करणार आहेत. हे मंदिर भगवान महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इतकंच नाही तर, चारधामांमध्ये या मंदिराचा समावेश आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचं रामायण काळासोबत खास नातं आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

पंतप्रधान मोदी तामिळनाडू दौऱ्यावर:

रामनवमीचे औचित्य साधून रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूमधील रामनाथस्वामी मंदिरात जाणार आहेत. या शुभ दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिरात येऊन शिवलिंगाची पूजा करणार आहेत.

रामायण काळासोबत आहे 'या' मंदिराचा संबंध:

रामनाथ स्वामी मंदिर हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे स्थित आहे. रामनाथ स्वामी मंदिर हिंदू धर्मातील बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि चार प्रमुख 'चारधाम' पैकी देखील एक आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित असून या मंदिराचा संबंध रामायण काळासोबत आहे.

हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते न्यू पंबन लिफ्ट ब्रिज’चं भव्य उद्घाटन

प्रभू श्रीरामाशी असलेली अध्यात्मिक नाळ:

रामायण काळात, प्रभू श्रीराम यांनी रावणाचा पराभव करून माता सीता आणि लक्ष्मणसह अयोध्येला परत येताना रामेश्वरममधील रामनाथ स्वामी मंदिर येथे विश्रांती घेतली होती. परंतु, रावण हा ब्राह्मण होता. ज्यामुळे, रावणाचा वध केल्यानंतर प्रभू श्रीराम यांनी आत्मशुद्धीसाठी आणि पापमोचनासाठी भगवान शंकराची पूजा करण्याचे निश्चय केले.

त्यासाठी, प्रभू श्रीराम यांनी रामेश्वर येथे शिवलिंगाची स्थापना केली. मान्यतेनुसार, हनुमान यांनी कैलास पर्वतावरून मूळ शिवलिंग घेऊन जात असताना विलंब झाला. त्यामुळे प्रभू श्रीराम यांनी वालूकामधून म्हणजेच वाळूच्या मदतीने शिवलिंग तयार केले. याच शिवलिंगाला 'रामलिंगम्' असे म्हणतात. त्यासोबतच, हनुमान यांनी आणलेल्या मूळ शिवलिंगाला मंदिरामध्ये 'विश्वलिंगम्' या नावाने पूजला जातो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री