बेंगळुरू दक्षिण लोकसभा खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) चे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या आणि कर्नाटक शास्त्रीय संगीत गायिका शिवश्री स्कंदप्रसाद गुरुवारी विवाहबंधनात अडकले. पारंपारिक पद्धतीने वैदिक मंत्रांच्या जपात हा विवाह सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र, केंद्रीय मंत्री व्ही सोमन्ना आणि अर्जुन राम मेघवाल यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आणि अनेक खासदार आणि आमदार उपस्थित होते. वरिष्ठ नेत्यांनी तेजस्वी आणि शिवश्री यांना आशीर्वादही दिले. तेजस्वी सूर्या यांची पत्नी शिवश्रीने चेन्नई संस्कृत महाविद्यालयातून बायो-अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ती भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे.
तेजस्वी सूर्याने रिसेप्शनपूर्वी पोस्ट केला व्हिडिओ -
तेजस्वी सूर्या यांनी कन्नड भाषेत एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये त्यांनी स्वागत समारंभात येणाऱ्या पाहुण्यांना भेटवस्तू म्हणून फुले, पुष्पगुच्छ किंवा सुकामेवा आणू नयेत असे आवाहन केले. त्यांनी म्हटलं आहे की, लग्नाच्या वेळी मिळणारी 85 टक्के फुले आणि पुष्पगुच्छ कार्यक्रमाच्या 24 तासांच्या आत फेकून दिले जातात आणि लग्नांमध्ये दरवर्षी 300,000 किलो सुकामेवा उरतो. अशा पुष्पगुच्छ आणि सुक्या मेव्याचे संभाव्य देणगी मूल्य दरवर्षी 315 कोटी रुपये असल्याचं तेजस्वी सूर्या यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तेजस्वी सुर्या यांनी पाहुण्यांना समारंभात फुले, हार किंवा सुकामेवा आणू नये अशी विनंती केली.
फुलांचे गुच्छ हे राष्ट्रीय कचरा नाहीयेत - तेजस्वी सूर्या
दक्षिण भारत फ्लोरिकल्चर असोसिएशनने भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांना फुलांच्या गुलदस्त्यांना "राष्ट्रीय कचरा" म्हणणारे त्यांचे अलिकडेचचे विधान मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सूर्याने 10 मार्च रोजी आपल्या लग्न समारंभासाठी जनतेला आमंत्रित करताना, त्याच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्ह सत्रांमध्ये लोकांना फुलांचे गुलदस्ते देण्यापासून परावृत्त करण्याची विनंती करत त्याला "राष्ट्रीय कचरा" म्हटले होते.
हेही वाचा - काय सांगता!! 'या' राज्यात आता कोणत्याही चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 200 रुपयांपेक्षा जास्त नसणार
कर्नाटकात 38 हजार हेक्टरमध्ये फुलांची लागवड -
दक्षिण भारत फ्लोरिकल्चर असोसिएशनचे अध्यक्ष टी एम अरविंद यांनी म्हटल आहे की, एका जबाबदार नेत्याकडून येणारे असे भाष्य अयोग्य आहे. त्यांचे हे विधान ज्या लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी फुलशेतीवर अवलंबून आहेत त्यांच्या कष्टांना कमी लेखते. अरविंद यांच्या मते, कर्नाटकात 38,000 हेक्टरमध्ये फुलांची लागवड केली जाते, त्यापैकी 1,500 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र व्यावसायिक फुलशेतीसाठी वापरले जाते.