Friday, March 21, 2025 09:49:31 AM

दिल्लीतील महिलांना मिळू शकते भाजपच्या नव्या सरकाकडून 'हे' खास गिफ्ट; पहिल्या मंत्रिमंडळात घेतला जाणार निर्णय

, पक्षाचे ज्येष्ठ नेते विजेंदर गुप्ता यांनी दिल्ली सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातील याबाबत खुलासा केला आहे.

दिल्लीतील महिलांना मिळू शकते भाजपच्या नव्या सरकाकडून हे खास गिफ्ट पहिल्या मंत्रिमंडळात घेतला जाणार निर्णय
Vijendra Gupta
Edited Image

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते विजेंदर गुप्ता यांनी दिल्ली सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातील याबाबत खुलासा केला आहे. विजेंद्र गुप्ता यांनी सांगितले की, यावेळीच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि दिल्लीच्या जनतेला जाते. 

महिलांना देण्यात येणाऱ्या मानधनावर निर्णय -  

पहिल्या मंत्रिमंडळात महिलांना देण्यात येणाऱ्या मानधनावर निर्णय घेतला जाणार असल्याचं विजेंद्र गुप्ता यांनी सांगितलं आहे. गुप्ता यांनी दावा केला की, ते आता दिल्लीत रस्ते, पाणी, गटार आणि यमुना स्वच्छतेचे काम योग्यरित्या पार पाडतील. जनतेने पंतप्रधान मोदींवर विश्वास व्यक्त केला आहे आणि मोदींच्या हमीमुळे पक्षाला मोठा विजय मिळाला असल्याचंही यावेळी गुप्ता यांनी नमूद केलं. 

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीनंतर प्रवेश वर्मा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता

विजेंद्र गुप्ता यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या पत्राशी जनता थेट जोडली गेली. मी रोहिणीमध्ये माझा निवडणूक प्रचार पायी केला. मी प्रत्येक घरात जाऊन माझा मुद्दा मांडला. मी लोकांना भेटलो आणि म्हणूनच यावेळी माझ्या मतांची टक्केवारी वाढली आहे. 

हेही वाचा -Delhi CM Atishi Resign: मुख्यमंत्री आतिशी आज सकाळी 11 वाजता LG कडे सोपवणार राजीनामा

भ्रष्टाचारामुळे आम आदमी पक्षाचा पराभव - विजेंद्र गुप्ता

आम आदमी पक्षाच्या पराभवावर विजेंद्र गुप्ता यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी खोटे बोलून दिल्लीची दयनीय अवस्था केली आहे. तसेच, भ्रष्टाचाराने आम आदमी पक्षाचा पराभव केला आहे. हे लोक सामान्य लोक असल्याचे भासवायचे पण जनतेला समजले की, त्यांना सामान्य नाही तर खास व्हायचे आहे.
 


सम्बन्धित सामग्री