मुंबई : महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होईल. निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी एक ट्वीट केले.
निर्णायक क्षण आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, मौलाना आझाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध आहे. आपण पुढे येऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र लढुया आणि समृद्ध महाराष्ट्र घडवुया; असे ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.