Saturday, February 08, 2025 06:05:54 PM

Massjog Village Santosh Deshmukh Case News
बीड मस्साजोग गावातून मोठी बातमी; काय म्हणाले धनंजय देशमुख ?

धनंजय देशमुख आणि सीआयडी अधिकाऱ्यांमध्ये बैठक; मस्साजोग गावातील आंदोलन तूर्तास स्थगित ?

बीड मस्साजोग गावातून मोठी बातमी काय म्हणाले धनंजय देशमुख 

बीड : जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून सुरू असलेल्या तपासाची माहिती मागविण्यात आली होती. याची दखल घेत केज येथील विश्रामगृहावर सीआयडीचे अधीक्षक सचिन पाटील आणि धनंजय देशमुख यांच्यासह शिष्टमंडळाने बैठक घेतली.

या बैठकीदरम्यान उद्या मस्साजोग गावात होणारे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. या प्रकरणात वाल्मीक कराड यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करून मोक्काअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला होता. तथापि, या चर्चेमुळे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.

धनंजय देशमुख उद्या एसआयटीचे अध्यक्ष बसवराज तेली यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत आपली भूमिका मांडली आहे.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 

काय म्हणाले धनंजय देशमुख - 
"मी आणि गावकरी आमचे शिष्टमंडळ सीआयडीला भेटलो आहोत."
"उद्या एसआयटीचे तेली यांना भेटणार आहोत कारण त्यांच्याकडे हा तपास आहे."
"आमचा विश्वास आहे की तपास योग्य रीतीने सुरू आहे. उद्या ते येतील, तेव्हा सर्व समजेल."
"मी गावकऱ्यांना विनंती करून उद्याचे आंदोलन स्थगित केले आहे."
"एसआयटी अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल."
"आमचा मुख्य मुद्दा असा आहे की, पहिल्या चार दिवसांतील तपास तुमच्याकडे आला आहे का?"
"सीआयडी अधिकाऱ्यांनी आम्हाला योग्य तपास होईल, असा शब्द दिला आहे."
"माझं मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं नाही. उपमुख्यमंत्री बोलणार होते, मात्र बोलणे झाले नाही."
"उद्या दुपारी ३ वाजता बसवराज तेली यांना भेटणार आहोत."
आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी प्रतीक्षा
या चर्चांनंतर मस्साजोग गावातील उद्याचे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असून, धनंजय देशमुख यांच्या एसआयटी अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या चर्चेनंतर पुढील दिशा ठरवली जाईल.

👉👉 हे देखील वाचा : Santosh Deshmukh Murder Case: वाल्मिक कराड हाजीर हो!


 


सम्बन्धित सामग्री