गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव आत्राम यांची मुलगी शरद पवारांच्या राशपात गेली आहे. आमदार धर्मराव आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हिनं राशपात प्रवेश केला. भाग्यश्री राशपच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अहेरीतून राष्ट्रवादीच्या तिकिटावर धर्मराव आत्राम आणि भाग्यश्री आत्राम राशपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरल्यास राज्यात पहिल्यांदाच वडील विरुद्ध मुलगी असे चित्र निर्माण होईल.