Saturday, January 25, 2025 09:16:12 AM

Mohammed Siraj & Travis Head Controversy
सिराज-हेडवर ICC ची दंडात्मक कारवाई

ॲडलेड (Adelaide) कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा (India) जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि ट्रॅव्हिस हेड (Travis Head) यांच्यात वाद झाला.

सिराज-हेडवर icc ची दंडात्मक कारवाई

मुंबई - ॲडलेड (Adelaide) कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा (India) जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि ट्रॅव्हिस हेड (Travis Head) यांच्यात वाद झाला. चालू सामन्यात दोघांनी एकमेकांना डोळे वटारले होते, त्यांच्या वर्तनाची दखल आयसीसीने (ICC) घेतली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर सिराजने त्याला मैदान सोडण्यास सांगितले. त्यावेळी ट्रॅव्हिस हेडहीला रागाने काहीतरी बोलताना दिसला होता. या घटनेवर आयसीसीने दोन्ही खेळाडूंना कठोर शिक्षा सुनावलीय.

सिराजने ICC आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यात त्याला दोषी आढळल्यानंतर सिराजला त्याच्या मॅच फीच्या 20% दंड ठोठावण्यात आलाय. तर हेडवरसुद्धा कारवाई करण्यात आलीय. हेडला मॅच फीच्या २० टक्के दंडही ठोठावण्यात आलीय. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.13 चे उल्लंघन केल्याबद्दलही तो दोषी आढळला आहे.

सिराज आणि हेड यांच्यातील वादाबद्दल टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला , “त्यावेळी मी स्लिपमध्ये उभा होतो. दोघांमध्ये काय झाले ते मला कळले नाही. जेव्हा ते प्रतिस्पर्धी संघासोबत खेळतात तेव्हा असे प्रकार घडतात. त्यावेळी हेड शानदार फलंदाजी करत होता. आम्हाला त्याची विकेट घ्यायची होती. त्यावेळी आमच्या गोलंदाजांवर दबाव होता. त्याला विकेट मिळाली होती आणि तो सेलिब्रेशन करत होता, असंही कर्णधार रोहित म्हणाला.


सम्बन्धित सामग्री