मुंबई : मुंबईच्या प्रभादेवीतील रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. गौरी गणपतीचे विसर्जन आहे आणि रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. यामुळे विसर्जन मिरवणुकीवेळी अनर्थ घडण्याची भीती व्यक्त होत आहे. अद्याप हा खड्डा बुजवण्याचे काम झालेले नाही. यामुळे स्थानिक महापालिका प्रशासनावर टीका करत आहेत. खड्डा बुजवलेला नाही त्यामुळे सतर्क स्थानिकांनी खड्ड्याभोवती अडथळे ठेवून लोकांना सावध करायला सुरुवात केली आहे.