Monday, July 07, 2025 02:35:42 PM

छत्रपती संभाजीनगर पाणीटंचाईच्या फेऱ्यात

मराठवाडा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या ४६६ गावे, ७२ वाड्यांना ७२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर पाणीटंचाईच्या फेऱ्यात

प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, दि. ०२ जून २०२४ : मराठवाडा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या ४६६ गावे, ७२ वाड्यांना ७२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

यंदा जसजसा उन्हाचा पारा चढत आहे, तशी पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली आहे. जिल्ह्यातील गंगापूर , वैजापूर,पैठण व छत्रपती संभाजी नगर या तालुक्यांमध्ये सर्वाधिक भीषण पाणीटंचाईचा सामना नागरीक करत आहेत.५ मे पर्यंत सोयगाव आणि खुलताबाद तालुक्याला पाणीटं चाईच्या झळा फारशा जाणवत नव्हत्या; पण आता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या घशाला कोरड पडलेली असून प्रशासनाकडून तब्बल ७२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

 

छत्रपती संभाजीनगर १०३,  फुलंब्री ७६, सिल्लोड १००,  वैजापूर १४६ गंगापूर १४७, पैठण-१०६,  कन्नड ३७, सोयगाव २, खुलताबाद ९ अशाप्रकारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे.


सम्बन्धित सामग्री