Sunday, August 17, 2025 03:56:22 PM

नाराजांना कुरवाळण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न

शिवसेनेच्या नाराज नेत्यांना कुरवाळण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केला आहे.

नाराजांना कुरवाळण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न

मुंबई : महायुतीत तीन पक्ष असल्यामुळे शिवसेनेच्या अनेक इच्छुक नेत्यांना मंत्रिपदे देणे मुख्यमंत्र्यांना शक्य झाले नाही. यामुळे पक्षातील काही नेते नाराज होते. विधानसभा निवडणुकीआधी ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शिवसेनेच्या नाराज नेत्यांना कुरवाळण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केला आहे. आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी तर खासदार हेमंत पाटील यांची हळद संशोधन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


सम्बन्धित सामग्री