Sunday, August 17, 2025 04:53:48 PM

वक्फ निधी प्रकरणी फडणवीस कठोर

वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर नाराजी केली आहे. या प्रकरणी सरकार येताच चौकशी करणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.

वक्फ निधी प्रकरणी फडणवीस कठोर

मुंबई : वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर नाराजी केली आहे. या प्रकरणी सरकार येताच चौकशी करणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. त्यांनी समाजमाध्यमात पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. 'राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्यासंदर्भात प्रशासनाने GR काढण्याचा प्रकार योग्य नसल्याने मुख्य सचिवांनी तत्काळ तो आदेश मागे घेतला आहे. राज्यात नवीन सरकार येताच याचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी केली जाईल;' असे ते म्हणाले.

राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपयांचा निधी देण्यासाठी 28 नोव्हेंबर 2024 रोजी शासन निर्णय काढला. मुख्य सचिवांनी त्यात हस्तक्षेप करत हा आदेश रद्द करण्याचे निर्देश दिले. प्रशासकीय चूक असे कारण देत जारी केलेला शासन निर्णय प्रशासनाने रद्द केला आहे. 

राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना परस्पर आदेश काढताही येत नाही आणि कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. पण हा आदेश प्रशासकीय पातळीवर निघाला आहे. त्यामुळे ती चूक तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर चूक दुरुस्त करण्यात आली. 

वक्फ बोर्डाबाबतचा शासन निर्णय जाहीर होताच राज्यातील हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. फक्त एका समाजाला खूश करण्यासाठी पैशांचे वाटप करू नये. सर्वांना समान न्याय करावा, अशी भूमिका हिंदू संघटनांनी घेतली. हिंदू संघटना रोष व्यक्त करत असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना गडबड झाल्याची जाणीव झाली. यानंतर प्रशासकीय चूक झाल्याचे कारण देत वक्फ बोर्डाला दहा कोटी देण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. 


सम्बन्धित सामग्री