Sunday, August 17, 2025 04:05:52 PM

महसूलच्या पंचनाम्यात पुरवठा विभागाचे गौड बंगाल उघड

सोयगाव तहसीलच्या पुरवठा विभागाकडून पुरवठा होणाऱ्या रेशनच्या धान्यात चक्क गोनी मागे तीन ते चार किलो धान्य कमी भरल्याचे  महसूलच्या पथकानी केलेल्या रेशन दुकानाच्या पंचनाम्यात उघड झाले आहे.

महसूलच्या पंचनाम्यात पुरवठा विभागाचे गौड बंगाल उघड
ration fraud

प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव तहसीलच्या पुरवठा विभागाकडून पुरवठा होणाऱ्या रेशनच्या धान्यात चक्क गोनी मागे तीन ते चार किलो धान्य कमी भरल्याचे  महसूलच्या पथकानी केलेल्या रेशन दुकानाच्या पंचनाम्यात उघड झाले आहे. त्यामुळे संशय बळावला असून, ही धान्याची चोरी कोण करतो असाही प्रश्न आता उभा राहिला आहे. त्यामुळे मापात पाप करणाऱ्यांची तातडीने चौकशी करून दोषी असलेल्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून थेट महसूल पथकाकडे करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री