मुंबई : आज सकाळपासून सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक एक अपडेट समोर येत आहे. बुधवारी रात्री झालेल्या हल्ल्यात सैफला 6 जखमा झाल्या. त्यापैकी 2 जखमा या खोलवर झाल्या आहेत. लिलावती रुग्णालयात सैफवर उपचार सुरू आहेत. नुकतच या हल्ल्यातील मुख्य आरोपीलाही पोलिसांनी पकडले आहे.
हेही वाचा : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील मोठी अपडेट समोर
काय आहे घटनाक्रम?
सैफ अली खानच्या वांद्रे येथील सदगुरू शरण निवासस्थानी घरात रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास एका आरोपी शिरला. आरोपी ज्या ठिकाणाहून घरात शिरला तिथे घर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची रूम होती आणि त्या रूमच्या बाजूला सैफ अली खान याच्या मुलांची रूम आहे. आरोपी हा त्या रूमच्या बाजूने जात असताना घर काम करणाऱ्या महिलेने आरोपीला पाहिले. त्यावेळी त्या महिलेने त्या आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला थांबवले आणि आरडा ओरडा सुरू केली. त्यावेळी आरोपींनी त्या महिलेवर देखील चाकूने हल्ला केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून सैफ अली खान वरच्या मजल्यावरून खाली आला.सैफ अली खानला पाहताच आरोपीने महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि चाकूचा धाक दाखवून याच्याकडून एक कोटींची रुपयाची मागणी केली अशी माहिती समोर आली आहे.त्यानंतर आरोपीने महिला लिमा फिलिप्स हिच्यावर चाकूने हल्ला केला.तिच्या हाताला मोठी जखम झाली त्यानंतर सैफ अली खान समोर आला असताना त्याच्यावरही हल्ला केला.सैफच्या मानेवर, खांद्यावर,पाठीवर आणि हातावर वार केले आणि पायऱ्यांवरून इमारतीबाहेर पळाला दरम्यान करीना कौटुंबिक पार्टी करिता बाहेर गेली होती . त्यावेळेस ती इमारतीच्या आवारात आली असता तिला गोंधळ दिसून आला त्यानंतर तिने सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम याला फोन करून बोलावले आणि सैफ अली खान,आणि जखमी महिला कर्मचारी याना रिक्षाने लीलावती रुगणालयात उपचारासाठी भरती केले. वांद्रे पोलिसांना याची माहिती मिळतात पोलीस सैफ अली खानच्या घरी रवाना झाले तपासणी केली त्यामध्ये इमारतीतील सीसीटीव्ही आणि सैफच्या घरातील सीसीटीव्ही तपासले यासाठी विशेष दहा ते बारा पथक तयार केले मुंबई गुन्हे शाखेने सुद्धा वेगवेगळे तपास पथक तयार केले. आरोपीचा शोध घेत आहे त्याचबरोबर पोलिसांचे खबरे आहेत त्यांना आरोपीचा फोटो दाखवून शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.