Saturday, January 25, 2025 08:02:55 AM

Navy Recruitment
नौदलात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

नौदलात काम करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे.

नौदलात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : नौदलात काम करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय नौदल भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. १४ डिसेंबर २०२४ ला नौदल भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्याची अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२५ होती. या तारखेमध्ये राज्य सरकारने बदल करून १३ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

ज्या तरुणांना नौदलात करिअर करण्याची इच्छा आहे. त्यांना १३ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (एसएससी- एक्झिक्युटिव) पदासाठी नौदालात जागा रिक्त आहेत. या पदासाठी १५ जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या पदासाठी ६० टक्के गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence) किंवा MCA + BCA/BSc (Computer Science+IT) शिक्षण झालेल्या तरुण यासाठी अर्ज करू शकतात. 

हेही वाचा : जालन्यातील जनआक्रोश मोर्चातील आयोजकांना नोटीस


नौदलातील भरतीसाठी २ जुलै २००० ते १ जानेवारी २००६ दरम्यान जन्म  झालेले यासाठी अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये संपूर्ण भारतात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी राज्य सरकार कोणतेही शुल्क आकारणार नाही. नौदल भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तरूण आणि तरूणींनी लवकरात लवकर अर्ज करावा. नौदलात काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी सुवर्ण संधी आहे. 


सम्बन्धित सामग्री