Wednesday, July 16, 2025 09:01:16 PM

‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात बुधवारी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस
Heavy Rain

मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात बुधवारी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे जिल्ह्यालाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस पडणार असल्याने जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 


सम्बन्धित सामग्री