मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात आघाडी करणारे पक्ष आता आघाडीतून बाहेर पडू लागले आहेत. महाराष्ट्रात आघाडीचा पुरता धुव्वा उडाला. आता दिल्ली विधानसभेसाठी आप आणि काँग्रेस स्वंतत्रपणे लढणार आहेत. आघाडीत फूट पडल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसणार असल्याचा घरचा आहेर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
दिल्ली विधानसभेसाठी इंडिया आघाडीत फूट पडलीय
आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहे
हिच बाब दिल्लीत काँग्रेसच्या अपयशाचं कारण ठरेल
दिल्लीच्या निवडणुका काँग्रेससाठी फार महत्त्वाच्या आहेत
आपचे अरविंद केजरीवाल दिल्ली जिंकतील
दिल्लीत आघाडी एकत्र लढली असती तर विजय निश्चित झाला असता
हेही वाचा : राज्यातील ग्रामपंचायतींचं कामबंद आंदोलन
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांनी चव्हाणांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. आप आणि केजरीवाल यांच्या विजयाची चव्हाणांना एवढी खात्री असेल तर त्यांनी आप पक्षात प्रवेश करावा अशा आशयाचा पोस्ट व्हायरल झाल्या. या विरोधातील पोस्टनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनीही स्वतः पोस्ट करत त्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांची एक्स पोस्ट
माझ्या विधानांचा संदर्भाबाहेर अर्थ लावण्यात आलाय
एकत्र लढलो असतो तर अलायन्सचा विजय निश्चित झाला असता
आता काँग्रेस पक्षाला प्रचंड गती मिळाली आहे
मला खात्री आहे की आपण विजयी होऊ
पृथ्वीराज चव्हणांनी त्यांच्या मूळ विधानावर नंतर सारवासरव केली असली तरी काँग्रेसप्रणित आघाडीत घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरे यांनी पुन्हा तोच सूर लावला असून दिल्लीत केजरीवाल यांचे काम चांगले असल्याचा दावा त्यांनी केलाय.
भाजपाविरोधात एकत्र आलेल्या आघाडीला निवडणुकीत यश न मिळाल्याने तसेच आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे या मुद्यावरून मतभेद सुरू झाले. केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या आघाडीतून अनेक पक्ष बाहेर पडू लागले आहेत.