Sunday, August 17, 2025 08:09:23 AM

आता नजरा २३ तारखेकडे

मतदानाची वेळ संपली असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता शनिवार २३ नोव्हेंबरच्या निकालाकडे आहे.

आता नजरा २३ तारखेकडे

मुंबई : मतदानाची वेळ संपली असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता शनिवार २३ नोव्हेंबरच्या निकालाकडे आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. मतमोजणीला शनिवारी सकाळी आठ वाजता सुरुवात होईल. 

विधानसभेसाठी महाराष्ट्रात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करण्याची संधी होती. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जे संध्याकाळी सहा वाजता रांगेत होते त्यांना वेळ संपली तरी मतदान करता येईल. राज्यात अनेक ठिकाणी या नियमामुळे मतदान सुरू आहे. मतदान केंद्रांचे मुख्य प्रवेशद्वार बंद करुन रांगेत असलेल्यांना मतदानाची संधी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे वेळ संपली तरी राज्यात अनेक ठिकाणी मतदान संपलेले नाही. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक आयोग जाहीर करेल. 


सम्बन्धित सामग्री