मोठी बातमी! पूर्णेकर मृत्यूप्रकरणात मीनाक्षी शिंदे यांचा अखेर राजीनामा

पूर्णेकर हत्याकांड प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला.

मोठी बातमी! पूर्णेकर मृत्यूप्रकरणात मीनाक्षी शिंदे यांचा अखेर राजीनामा
Pradeep Purnekar Case

मानपाडा येथील शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणात माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. तर दुसरीकडे पूर्णेकर कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी ठाण्यात सर्वपक्षीय आंदोलन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेकडून ठाण्यात आंदोलन करण्यात येत आहे.

या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी पूर्णेकर कुटुंबाकडून गेल्या महिन्याभरापासून करण्यात येत आहे. दरम्यान, आता मीनाक्षी शिंदे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पूर्णेकर हत्याकांड प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. पूर्णेकर हत्याकांड प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप झाले होते.

हेही वाचा- प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; “त्या गोष्टी मी बोलायला लागले तर…” चौकशीनंतर नेमकं काय म्हणाल्या?

हत्याकांडानंतर तब्बल 30 दिवसांनी मीनाक्षी शिंदे यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मिनाक्षी शिंदे या सध्या ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि नगरसेविका आहेत. मिनाक्षी शिंदेंकडे लाडकी सून पदाची देखील जबाबदारी आहे, मात्र त्यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र देत या पत्रात त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

पत्रात काय लिहलं?

“माननीय साहेब,

गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच पक्षांतर्गत माझ्याबाबत सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप व सर्वबाबींचा एकत्रित वेध घेऊन माझ्यावर विविध आरोप करता पक्ष नेतृत्वाचा अर्थात मुख्य नेते व पक्षांतर्गत म्हणून आपणास वेढीस धरण्याचे जे षड्यंत्र चालू आहे ते पाहून माझ्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत.

मी आजवर संपूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले. पक्षाला किंवा आपणांस कधीही मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य केले नाही. तरीही, ज्या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही, त्यामध्ये माझे नाव जोडून आपल्यावर आणि पक्षावर दबाव निर्माण केला जात आहे, हे पाहून मन व्यथित होते.

ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी मी आजवर काम केले, त्याच नेतृत्वाच्या बदनामीचे कारण माझ्यामुळे व्हावे, हे कल्पनाही मला सहन होत नाही. माझी निष्ठा आणि माझ्या कार्याची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची भावना मनाला बोचत आहे. म्हणूनच, मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपूर्द करीत आहे. हा निर्णय नाराजीतून नव्हे, तर आपल्या नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला आहे.

माझ्या भावनांची बाजू आपण समजून घ्याल, ही अपेक्षा.

आपली विश्वासू,
(स्वाक्षरी)
सौ. मीनाक्षी राजेंद्र शिंदे”

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number