Friday, July 11, 2025 05:21:30 AM

सहावीच्या वर्गातील फक्त 53 टक्के विद्यार्थ्यांना येतात 10 पर्यंत पाढे; शिक्षण मंत्रालयाच्या सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा

या सर्वेक्षणात 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 781 जिल्ह्यांमधील 74,229 शाळांमधील तिसरी, सहावी आणि नववीच्या सरकारी आणि खाजगी शाळांमधील 21,15,022 विद्यार्थ्यांचा समावेश होता.

सहावीच्या वर्गातील फक्त 53 टक्के विद्यार्थ्यांना येतात 10 पर्यंत पाढे शिक्षण मंत्रालयाच्या सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा
Education survey

नवी दिल्ली: शिक्षण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या सर्वेक्षणात म्हटलं आहे की, सहावीच्या वर्गातील फक्त 53 टक्के विद्यार्थ्यांना 10 पर्यंत पाढे येतात. या सर्वेक्षणात 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 781 जिल्ह्यांमधील 74,229 शाळांमधील तिसरी, सहावी आणि नववीच्या सरकारी आणि खाजगी शाळांमधील 21,15,022 विद्यार्थ्यांचा समावेश होता. सर्वेक्षणात म्हटले आहे की, तिन्ही इयत्तेतील 1,15,022 मुलांचे मूल्यांकन करण्यात आले. 

हेही वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात होऊ शकते 'इतकी' वाढ

अहवालानुसार, इयत्ता तिसरीच्या फक्त 55 टक्के विद्यार्थ्यांना 99 पर्यंतच्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडता आल्या, तर केवळ 58 टक्के विद्यार्थी दोन-अंकी संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करू शकतात. तथापी, इयत्ता सहावीतील फक्त 53 टक्के विद्यार्थ्यांना अंकगणितीय क्रिया आणि त्यांच्यातील संबंध समजतात. 

हेही वाचा - कौतुकास्पद! भारतीय वंशाचे सबीह खान होणार 'अॅपल'चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

विद्यार्थ्यांना गणितात सर्वात कमी गुण - 

इयत्ता सहावीमध्ये भाषा आणि गणितासह 'आपल्याभोवतीचे जग' हा अतिरिक्त विषय सादर करण्यात आला, ज्यामध्ये पर्यावरण आणि समाजावर प्रश्न विचारण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर गणितात सर्वात कमी गुण (46 टक्के) मिळवले, तर भाषेत सरासरी 56 टक्के आणि आपल्याभोवतीच्या जगात 49 टक्के गुण मिळाले. तथापी, नववीच्या वर्गात, केंद्र सरकारच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. 
 


सम्बन्धित सामग्री