Bhagwan Shiva Worship in Shravan : श्रावण महिना सुरु होत आहे. श्रावण महिना आला, की सणांची रांगच लागते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा आणि मंगळागौर यांसारखे सण या महिन्यात उत्साहात साजरे केले जातात. श्रावणी सोमवार हा हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेला दिवस आहे. या महिन्यात भगवान शंकराची पूजा-अर्चा केली जाते आणि श्रावणी सोमवारी महादेवाला शिवामूठ वाहिली जाते. या महिन्यात शंकराच्या भक्तीने मनोभावे प्रार्थना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा लोकांमध्ये श्रद्धापूर्ण विश्वास आहे.
श्रावणी सोमवार हा हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेला दिवस आहे, जो श्रावण महिन्यातील सोमवारी साजरा केला जातो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा-अर्चा केली जाते आणि श्रावणी सोमवारी महादेवाला शिवामूठ वाहिली जाते. शिवामूठ म्हणजे काय आणि ती कशी वाहिली जाते, जाणून घेऊ.
हेही वाचा - Shravan 2025: यंदाच्या श्रावणात 'या' 5 राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; जाणून घ्या
अशी एक श्रद्धा आहे की, ज्यात भगवान शिव आणि पार्वती श्रावण महिन्यात जगाचं पालकत्व घेतात. त्यामुळे या महिन्यात केली जाणारी शिव उपासना अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि ती लवकरच फलदायी देखील ठरते, अशी लोकांची श्रद्धा आहे. अविवाहित तरुणी देखील या काळात चांगला पती मिळावा यासाठी शिवउपासना करतात.
श्रावण महिन्यात शिवामूठ का वाहतात?
या शिवामुठीविषयी पौराणिक महत्त्व सांगितले जाते. माता पार्वतीने भगवान शंकरांना मिळवण्यासाठी शिवामुठीचे हे व्रत केलं होतं आणि त्यामुळे श्रावणी सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ भगवान शंकराला वाहिली जाते. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस वाहिलं जातं. अविवाहित तरुणीदेखील हे शिवामुठीचे व्रत करू शकतात. यासंबंधीची एक कथाही श्रावण महिन्यात वाचल्या जाणाऱ्या धार्मिक कथांमध्ये आढळते.
हेही वाचा - नरकात जाण्यापासून वाचण्यासाठी शास्त्रांमध्ये सांगितलेत हे उपाय; पापांपासून मिळेल मुक्ती
भगवान शंकरांना बेलाची पाने अत्यंत प्रिय आहे. तुम्ही देखील 'ॐ नमः शिवाय' म्हणत भगवान शंकरांना आपल्या इच्छेनुसार बेल अर्पण करू शकता. तसेच, 'ॐ त्र्यंबकम यजामहे' हा जप करणे किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करणेदेखील श्रावण महिन्यात विशेष फलदायी असते. श्रावण सोमवारी तुम्ही हे करू शकता.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)