Friday, May 24, 2024 09:43:55 AM

Sriram Patil voting
श्रीराम पाटील यांनी केले मतदान

रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

श्रीराम पाटील यांनी केले मतदान 
shriram patil voted

जळगाव, १३ मे २०२४, प्रतिनिधी : रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात राशपचे श्रीराम पाटील विरुद्ध भाजपाच्या रक्षा खडसे अशी प्रमुख लढत आहे. 
सोमवारी, १३ मे रोजी महाराष्ट्रासह देशभरातील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगांव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. 


सम्बन्धित सामग्री