Sunday, August 17, 2025 04:32:13 PM

Tesla वाहनांची विक्री वाढवण्यासाठी कंपनीची अनोखी शक्कल! आयुष्यभर मोफत चार्जिंग आणि व्याजमुक्त कर्जासह देणार 'या' खास ऑफर

सध्या टेस्लाच्या विक्रीवर वाईट परिणाम झाला आहे. ऑटोब्लॉगच्या एका अहवालानुसार, या घसरणीमुळे एलोन मस्कची कंपनी टेस्ला नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर लाँच करत आहे.

tesla वाहनांची विक्री वाढवण्यासाठी कंपनीची अनोखी शक्कल आयुष्यभर मोफत चार्जिंग आणि व्याजमुक्त कर्जासह देणार या खास ऑफर
Teslas Vehicle
Edited Image

Tesla Vehicle Sales Offers: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांची ईव्ही उत्पादक कंपनी टेस्ला भारतात आपला व्यवसाय सुरू करण्यास सज्ज आहे. यासाठी कंपनीने मुंबई आणि दिल्लीमध्ये शोरूमसाठी जागा देखील अंतिम केली आहे. परंतु, जगातील अनेक देशांमध्ये टेस्ला कारच्या विक्रीत लक्षणीय घट होत आहे. सध्या टेस्लाच्या विक्रीवर वाईट परिणाम झाला आहे. ऑटोब्लॉगच्या एका अहवालानुसार, या घसरणीमुळे एलोन मस्कची कंपनी टेस्ला नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर लाँच करत आहे.

टेस्लाकडून ग्राहकांना खास ऑफर्स - 

एलोन मस्कची कंपनी टेस्ला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या ऑफर्स लाँच करत आहे. यामध्ये व्याजमुक्त आणि कमी व्याजदराने कर्ज, कारसाठी आयुष्यभर मोफत चार्जिंग सुविधा यासारख्या ऑफरचा समावेश आहे. कंपनीने अलीकडेच एक नवीन कार सायबरट्रक लाँच केली आहे. टेस्लाकडून ही कार विकण्यासाठी ग्राहकांना ऑफर दिल्या जात आहेत. कंपनी या कारवर ग्राहकांना फक्त 1.99 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. हे कर्ज टेस्ला स्वतःच देत आहे. याशिवाय, टेस्ला चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना शून्य टक्के दराने कर्ज देत आहे.

हेही वाचा - Elon Musk यांना मोठा धक्का! Starship Rocket मध्ये प्रक्षेपणानंतर स्फोट; आकाशातून पडू लागले आगीचे गोळे, पहा व्हिडिओ

आयुष्यभर वाहन मोफत चार्ज करता येणार -  

दरम्यान, स्वस्त कर्जासोबतच, टेस्ला आपल्या ग्राहकांना सुपरचार्जरची मोफत सुविधा देखील देत आहे, ज्याद्वारे ग्राहक आयुष्यभर वाहने मोफत चार्ज करू शकतात. जगात 60,000 हून अधिक सुपरचार्जर आहेत जे टेस्लाच्या इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करतात.

हेही वाचा - Elon Musk Girlfriend Shivon Zilis: एलोन मस्कची गर्लफ्रेंड शिवॉन कोण आहे? जिने मस्कच्या 14 व्या मुलाला दिला जन्म

टेस्लाच्या विक्रीत घट - 

फेब्रुवारी महिन्यात जगातील अनेक देशांमध्ये टेस्लाच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात जर्मनीमध्ये टेस्लाच्या विक्रीत 76 टक्के घट झाली. तसेच नेदरलँड्समध्ये ही घट 24 टक्के नोंदवण्यात आली आहे. तर स्वीडनमध्ये टेस्लाच्या विक्रीत 42 टक्के घट झाली आहे. फेब्रुवारीमध्ये टेस्लाच्या विक्रीत फ्रान्समध्ये 45, इटलीमध्ये 55 आणि स्पेनमध्ये 10 टक्के घट झाली. टेस्लाच्या कारच्या विक्रीत घट झाल्याने आता कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर लाँच केल्या आहेत. 


सम्बन्धित सामग्री