Wednesday, December 11, 2024 01:10:33 PM

Pollution
युक्रेन - इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ

युक्रेन - इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ झाली आहे.

युक्रेन - इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ

बाकू : युक्रेन - इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम जागतिक हवामानावर झाला आहे. सध्या सुरू असलेल्या दोन युद्धांमध्ये केवळ प्राणहानी आणि संपत्तीचे नुकसान होत नाही, तर त्यामुळे हवामान बदलाची समस्याही अधिक बिकट झाली असल्याचे पर्यावरण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जागतिक हवामान बदलाविषयीची संयुक्त राष्ट्रांची सर्वात महत्त्वाची सीओपी २९ परिषद अझरबैजानच्या बाकू शहरात सुरू झाली आहे. परिषदेच्या पहिल्याच दिवशी युद्धादरम्यान वातावरणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे सांगत युद्ध थांबवण्याची मागणी केली गेली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या मागील दोन वर्षांमध्ये १७.५ कोटी टन कार्बन डायऑक्साईडसह इतर हरितगृह वायूंचे उत्सर्जन झाले असावे असा अंदाज हवामान संशोधकांनी व्यक्त केला आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo