बऱ्यादा भूक भागवण्यासाठी अनेकजण फास्ट फूड्सचे सेवन करतात किंवा कामाच्या व्यस्त दिनचर्येमुळे आपल्या जेवणाच्या वेळेमध्ये बदल होतात. ज्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. हृदयविकार, वेळेत झोप न लागणे, व्यायाम न करणे अश्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. हे उपाय केल्यास लवकरच तुमचे वजन कमी होऊ शकते आणि त्यासोबतच तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होईल.
1 - जास्त पाणी असलेल्या पदार्थांचे सेवन करा:
काकडी, गाजर, मोसंबी, डाळिंब, कलिंगड, संत्री यांसारख्या फळांचे जास्तीत जास्त सेवन करा. याचे सेवन केल्याने शरीरामध्ये ऊर्जेचा संचार वाढतो आणि त्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासदेखील मदत होते. या फळांमुळे आपल्या पाचन शक्तीमध्येदेखील सुधारणा होते. या फळांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्याच्यामुळे जितके जास्त ही फळे खाता येईल तितके जास्त पाणी असलेल्या पदार्थांचे सेवन करा.
हेही वाचा: Guava Benefits: पेरू आणि त्याची पाने तुमच्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर ?
2 - फायबरयुक्त भाज्यांवर भर द्या:
ब्रोकोली, कोबी, पालक, कोथिंबीर, अश्या विविध हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे आपल्याला त्यातून मोठ्या प्रमाणात फायबर मिळतात. या हिरव्या भाज्या आरोग्यासाठी गुणकारी असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते त्यासोबतच तुमच्या त्वचेवर ग्लो येतो आणि तरुण दिसण्यासदेखील सुरुवात होते.
हेही वाचा: उपवासासाठी परफेक्ट साबुदाणा खीर! या 5 सोप्या टिप्सने बनवा स्वादिष्ट आणि मलाईदार खीर
3 - कोल्ड ड्रिंकचे सेवन कमी करणे:
सोडा, प्रक्रिया केलेली साखर आणि पदार्थ, मद्यपान इत्यादी गोष्टींमुळे कॅलोरीमध्ये वाढ होते. त्यासोबतच तुमच्या शरीरात अनावश्यक फॅट्सदेखील वाढते. इतकेच नाही तर या पदार्थ्यांमुळे आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. त्यामुळे शक्य तितके या पदार्थांच्या सेवनपासून लांब राहावे. या घातक पदार्थांचे सेवन करण्याऐवजी हर्बल टी, पाणी, कमी कॅलरी असलेले पेयचे सेवन करा ज्यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
अशाप्रकारे, वरील गोष्टींचे नियमीत सेवन केल्यास आणि त्यासोबत व्यायाम, योगा, डाएट चार्ट प्रमाणे सेवन केल्यास लवकरच तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)