राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी भाजपच्या मंत्र्यांसाठी सागर निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे जेवण आयोजित करण्यात आले असून, या माध्यमातून अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत मुख्यमंत्री मंत्र्यांना अधिवेशनात प्रभावी सहभाग घेण्याचे आणि कामकाज उत्तम रित्या पार पाडण्याचे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, सरकारच्या धोरणांबाबत सखोल माहिती घेऊन प्रश्नांना स्पष्ट आणि ठोस उत्तरे देण्याचे कानमंत्र देण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Maharashtra Budget Session 2025: आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; विरोधक कोणत्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरणार? वाचा सविस्तर वृत्त
अधिवेशनात सर्व मंत्र्यांनी अधिकाधिक उपस्थित राहावे आणि विरोधकांच्या टीकेला ठाम प्रत्युत्तर द्यावे, यासाठी मुख्यमंत्री मंत्र्यांना सूचना देऊ शकतात. तसेच, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी जनतेपर्यंत योजनांची माहिती कशी पोहोचवायची, याबाबतही या स्नेहभोजनाच्या निमित्ताने चर्चा होण्याची शक्यता आहे.