बीड : राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तीन महिन्यांपासून तापले आहे. अशातच आज मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे आरोपी म्हणून नाव आल्यानंतर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेर आज धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांच्या भगिनी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे.
‘हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता’
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भगिनी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. मी त्याचाही स्वागत करते, हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. राजीनामा यापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती. त्यामुळे कदाचित पुढच्या भागांना सामोरं जावं लागलं नसतं. हा राजीनामा फार आधीच झाला असता तर त्याला या सगळ्या वेदनांपासून गरिमामय मार्ग मिळाला असता असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
हेही वाचा : Dhananjay Munde Statement: राजीनाम्यानंतर मुंडेंनी पोस्टमधून दिले कारण; काय म्हणाले?
‘परिवाराच्या जीवाच्या वेदनापुढे हे काही मोठे नाही’
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मी त्यांची लहान बहीण आहे.आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम केलं होतं. पण कोणत्याही आईला आणि बहिणीला आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुखातून जावं लागेल. पण आपण खुर्चीवर बसून विचार करतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकासारखा विचार केला पाहिजे. त्या परिवाराच्या जीवाच्या वेदनापुढे हे काही मोठे नाही, त्यांनी जो घेतलाय तो योग्य निर्णय आहे, देर आये दुरुस्त आहे.
‘त्याच्या आईची क्षमा मागते’
पंकजा मुंडे यांनी ज्यावेळी मी खुर्चीवर बसले. तेव्हा मी एक शपथ घेतलेली आहे. आमदारकीची शपथ घेतलेली आहे. कुठलाही ममत्व भाव, कोणाविषयी आकस किंवा द्वेष न बाळगता काम केले पाहिजे यावर मी ठाम आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा निषेध व्यक्त करताना मी मनापासून क्षमा मागते. त्याच्या आईची, कारण ज्या मुलांनी ही निर्गुण हत्या केली आहे. ते माझ्या पदरात असतील दिले तरीही त्यांना कडक शासन करा असे मी म्हटले असते. कोणताही राजकीय नेता यापेक्षा वेगळे भाष्य करू शकणार नाही असे म्हटले आहे.
हेही वाचा : अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यमुक्त केले
पुढे बोलताना, एवढी निर्गुण हत्या झाली, त्यामुळे तो समाज एका आक्रोशात वावरत आहे. समाज आणि जात याच्यावर बोलायची गरज नाही, पण आता परिस्थिती तशीच आहे. प्रत्येक गोष्ट जातीवर जाते. गुन्हेगाराला कुठलेही जात नसते. त्यामुळे त्यावर निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याला देखील जात नसली पाहिजे. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं आणि 12 डिसेंबरला संपूर्ण भाषण दिलं होतं. यावर मी व्यक्त झालेली आहे. यामध्ये कोण आहे कोणाचा हात आहे हे केवळ तपास यंत्रणेला माहित आहे. त्यात कुठलाही हस्तक्षेप करण्याचा कारण नाही. ज्यांनी ही हत्या केली आहे. त्या मुलांमुळे समस्त राज्यात समाज ज्यांचा काही दोष नाही. ते सुद्धा मान खाली घालून गंभीरपणे वावरत आहेत असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.