Sunday, August 17, 2025 01:44:05 PM

'सर्व मांसाहारी आणि मद्य विक्री दुकाने बंद ठेवावे'; सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेला पत्र लिहून 21 आणि 22 जून रोजी सर्व मांसाहारी आणि मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली आहे.

सर्व मांसाहारी आणि मद्य विक्री दुकाने बंद ठेवावे सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

रोहन कदम. प्रतिनिधी. पुणे: अवघ्या काही दिवसांत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पुण्यात मुक्काम करणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेला पत्र लिहून 21 आणि 22 जून रोजी सर्व मांसाहारी आणि मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: 31 ऑगस्टपर्यंत पुण्यातील सर्व पर्यटनस्थळी नागरिकांना बंदी

सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी:

पुणे महापालिकेला पत्र लिहून सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की, 'या पालखीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आणि वारकरी पुण्यात येणार आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, म्हणून 21 आणि 22 जून रोजी शहरातील मटण, चिकन आणि मद्य विक्री बंद ठेवावी', अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष साठे यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीवर महापालिका प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: वाघोली परिसरात मुसळधार पावसाने रस्ते जलमय; नागरिकांची तारांबळ


सम्बन्धित सामग्री