Saturday, August 16, 2025 08:34:41 PM

पुढच्या महिन्यात सुरू होणारा अमरावती विमानतळ वादाच्या भोवऱ्यात

अमरावतीमधील विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे या विमानतळाला गुलाबराव महाराज यांचे नाव देण्याची हालचाल सुरु आहे.

पुढच्या महिन्यात सुरू होणारा अमरावती विमानतळ वादाच्या भोवऱ्यात

अमरावती: अमरावती विमानतळ पुढील महिन्यात सुरू होणार आहे. अमरावतीमधील विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे या विमानतळाला गुलाबराव महाराज यांचे नाव देण्याची हालचाल सुरु आहे. मात्र, अमरावती विमानतळाला स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी काही संघटनांकडून होत आहे. बुधवारी, 19 मार्च 2025 रोजी अमरावतीमधील जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, आणि पंजाबराव देशमुख फाउंडेशन यांच्या वतीने आंदोलन करत निवासी जिल्हाधिकारी अनिल भटकर यांना निवेदन देण्यात आले आहे. 'अमरावती विमानतळाला फक्त पंजाबराव देशमुख यांचे नाव द्या. अन्य कोणाचे नाव देऊ नये', अशी एकमुखी मागणी करण्यात आली होती.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती:

'अमरावती विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांच्याकडून विमानतळाचा परवाना मिळाला आहे आणि अलायन्स एअर, महिन्याच्या अखेरीस सुविधेवरून मुंबईसाठी उड्डाणे चालवेल', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


1992 मध्ये विकसित केले होते अमरावती विमानतळ:

बेलोरा येथे असलेले अमरावती विमानतळ सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागांनी 1992 मध्ये विकसित केले होते. परंतु ते सार्वजनिक वापरासाठी बंद राहिले होते. राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (MADC) परवाना आवश्यकता पूर्ण करण्यासाठी विस्तारित धावपट्टी आणि इतर सुधारणांसह अमरावती विमानतळाचे नूतनीकरण केले होते. 


'एक्स' वरील एका पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले:

'विमानतळ परवाना मंजूर होणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो अमरावतीमधून व्यावसायिक उड्डाणांसाठी मार्ग मोकळा करतो. ज्यामुळे, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक शक्यता वाढते', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले. 

'अमरावती विमानतळाला डीजीसीएने (DGCA) एअरोड्रोम परवाना दिला आहे, ज्यामुळे ते अधिकृतपणे परवानाधारक प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्कीम (RCS) विमानतळ म्हणून घोषित झाले आहे. ही कामगिरी वाढीव हवाई कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक वाढीच्या नवीन युगाची सुरुवात आहे.'

'अलायन्स एअर या महिन्याच्या अखेरीस अमरावती-मुंबई-अमरावती मार्गावर उड्डाणे सुरू करण्यास सज्ज आहे, जे विमानतळाचे पहिले नियोजित कामकाज असेल', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले. 
 


सम्बन्धित सामग्री