Beed Crime Satish Bhosle: 'कोणी बायांवर पैसे उधळतं, तर मी मित्राच्या आनंदासाठी उधळले, त्यात काय चूक?' असा थेट सवाल बीडमधील चर्चेत असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने केला आहे. या प्रकरणानंतर त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत चर्चा रंगल्या होत्या. पोलीस त्याचा शोध घेत असतानाच, खोक्या भाईने एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
'माझ्या पैशावर मी आनंद केला, त्यात माज कसला?'
मुलाखतीत बोलताना सतीश भोसले म्हणाला, “लोक लग्नात पैसे उधळतात, तिथे कोणी माज म्हणत नाही. मग मी माझ्या मेहनतीच्या पैशात मित्राच्या लग्नात आनंद साजरा केला, तर त्यात वाईट काय? सोशल मीडियावर बघा, लोक कोट्यवधी रुपये उधळतात, मी हजार रुपये उधळले तर एवढी चर्चा का?”
आपल्या व्हिडीओबद्दल तो पुढे म्हणाला, 'माझ्या हातात पैसे होते, म्हणून मी तो व्हिडीओ बनवला. हातात पैसा असतो तोपर्यंत आठवण म्हणून काहीतरी करून ठेवावं, असं वाटलं. यात माज नाही, फक्त मित्राचा आनंद होता.'
हेही वाचा: अर्थसंकल्प सादरीकरणात गुलाबी जॅकेट का नव्हते? अजित पवार यांचे स्पष्टीकरण
'माझ्या मित्राच्या पत्नीची छेड काढली, म्हणून शिक्षा दिली'
बॅटने मारहाणीबाबत स्पष्टीकरण देताना खोक्या भाई म्हणाला, “दिलीप ढाकणे नावाच्या व्यक्तीकडे माझ्या मित्राच्या पत्नीचा आंघोळीचा व्हिडीओ होता. तो व्हायरल करण्याची धमकी देत होता. माझ्या मित्राने मदतीची याचना केली, त्यामुळे मी तिथे गेलो. त्या वेळी संतापाच्या भरात मी त्याला बॅटने मारलं. यात जातीय भेदभावाचा काहीही संबंध नाही. मी आदिवासी आहे, माझा मित्र वंजारी आहे, पण हा प्रकार एका महिलेच्या सन्मानाशी संबंधित होता.”