Wednesday, June 18, 2025 02:57:03 PM

नवी मुंबईतील महिलेच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पतीनेच दिली होती सुपारी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच नवी मुंबईतील उलवे परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घटस्फोट देण्यास नकार दिल्याने पतीने 5 लाखांची सुपारी देऊन आपल्या पत्नीची हत्या केली होती.

नवी मुंबईतील महिलेच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट पतीनेच दिली होती सुपारी

नवी मुंबई: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच नवी मुंबईतील उलवे परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घटस्फोट देण्यास नकार दिल्याने पतीने 5 लाखांची सुपारी देऊन आपल्या पत्नीची हत्या केली होती. या प्रकरणी, पोलिसांनी दोन महिलांना आणि दोन चुलत भावांना अटक केली असून सुखप्रीत सिंह आणि गुरप्रीत सिंह हे दोन्ही आरोपी हरियाणातून आहेत.

रस्त्यावरून जाताना आरोपींनी धारदार शस्त्रांच्या मदतीने महिलेची हत्या केली होती. या घटनेमुळे, परिसरात खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेने सखोल तपास केला असता, महिलेच्या हत्येमागे तिच्या नवऱ्याचा हात असल्याचे समोर आले. पती किशोर सिंग राजपूत यांनी दोन महिला साथीदारांसोबत हत्येचा कट रचल्याचे उघड झाले.

हेही वाचा: 'आम्ही दिघे साहेबांना तुमच्यात बघतो'; वैष्णवीच्या कुटुंबीयांची शिंदेंकडे कारवाईची मागणी

नेमकं प्रकरण काय?

आर्थिक कारणांमुळे पती किशोर सिंह राजपूत आणि पत्नी अलविना राजपूत यांच्यात सतत वाद होत असे. पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिल्यामुळे किशोरच्या मनात राग होता. पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी त्याने 5 लाखांची सुपारी देऊन पत्नीची हत्या घडवून आणली. सुपारी अलिशा त्यागी आणि चरणजीत कौर या दोन महिलांना दिली. तसेच, अलविना काढण्यासाठी या दोघींनी हरियाणातून आणखी दोन आरोपींना बोलावले. या प्रकरणी पती किशोर सिंह राजपूत, दोन महिलांना आणि दोन चुलत भावांना अटक करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री