Sunday, August 17, 2025 05:13:35 PM

संतोष देशमुखांच्या हत्येवरुन भाजपा नेत्यांमध्येच जुंपली

धनंजय मुंडेंचं पद गेल्यावर पंकजांच शपथ न देण्याबाबत वक्तव्य केल्याचा आरोप आमदार धस यांनी केला आहे.

संतोष देशमुखांच्या हत्येवरुन भाजपा नेत्यांमध्येच जुंपली

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस सातत्याने आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. अशातच आता पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धस यांनी आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंचं पद गेल्यावर पंकजांच शपथ न देण्याबाबत वक्तव्य केल्याचा आरोप आमदार धस यांनी केला आहे. 

'देशमुख प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी पंकजांचे वेगवेगळे गेम'
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण तापले. बीड प्रकरणावरून गेले तीन महिने सातत्याने आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आता पंकजा मुंडे संतोष देशमुखांच्या घरी भेटायला गेल्या नाहीत. धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद गेल्यावर पंकजांच शपथ न देण्याबाबत वक्तव्य समोर आल्याचे धसांनी म्हटले आहे. पुढे बोलताना धस म्हणाले, मुंडेंचं मंत्रिपद जाईपर्यंत पंकजा एकही शब्द बोलल्या नाहीत. यामुळे राष्ट्रीय नेतृत्वाकडे पंकजा मुंडे यांची लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार धस यांनी देशमुख यांची हत्या झाल्यापासून सातत्याने या प्रकरणाची दखल घेत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी कोणताही विचार केला नसल्याचे पाहायला मिळाले आहे. यातच त्यांनी देशमुख प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी पंकजांचे वेगवेगळे गेम असल्याचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्चला होणार

'माझा संबंध नसताना गेल्या 3 महिन्यांपासून माझ्यावर बिनबुडाचे आरोप' 
आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपाला मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले आहे. माझा संबंध नसताना गेल्या 3 महिन्यांपासून माझ्यावर बिनबुडाचे आरोप होत आहेत. पक्षाची शिस्त म्हणून गेले तीन महिने गप्प होते असे प्रतिउत्तर मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहे. तसेच सुरेश धसांच्या आरोपांसंदर्भात मी पक्षश्रेष्ठींची चर्चा केली. पक्षश्रेष्ठींना सुरेश धसांना समज देण्याची विनंती केली असल्याचे पंकजा यांनी सांगितले आहे. 

धसांचे वार, पंकजांचा प्रहार 

धस माझं नाव घेऊन ज्या चर्चा करतात, त्याबाबत बावनकुळेंना कळवलं. ज्या विषयात माझा संबंध नाही, त्यामध्ये माझा उल्लेख करणं ,टिप्पणी करणं अपेक्षित नाही. पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहचू नये म्हणून मी नागपूर अधिवेशनापासून गप्प बसले. मात्र आता पक्षश्रेष्ठींकडे धसांना समज देण्याची विनंती केली . मी प्रचार केला नसता तर धस 75  हजारच्या लीडनं निवडून आले असते का? असा सवाल पंकजा मुंडेंनी धसांनी केला आहे. धसांना आक्षेप होता तर त्यांनी प्रचार सुरु असताना माझ्यावर आरोप करायचा होता. उलट लोकसभेला माझी लीड अर्ध्यावर आली. अनेकांनी मला मदत केली नाही, पण मी धसांवर आरोप केला का? असेही पंकजा म्हणाल्या. निकाल लागल्यापासून मी गप्प होते. मात्र आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली असल्याचे मंत्री पंकजा यांनी म्हटले आहे. 


सम्बन्धित सामग्री