बीड : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. प्रकरण सध्या बीड न्यायालयात असून वकिलांकडून सुनावणीवेळी युक्तिवाद केले जात आहेत. त्यातच आता देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे.
26 मार्चला बीडच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या. जो काही युक्तिवाद झाला. त्याच्यामध्ये असं स्पष्ट झाले आहे की जे काही गुन्हेगारी आहेत. ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे. असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना आम्ही पहिल्यापासून म्हणत आहोत हे आरोपी एकच आहेत. अपहरण ते खून ही संपूर्ण घटना एकच आहे. हे आरोपी एकच आहेत. या आरोपींनी अपहरण करून हत्या केली. त्या संदर्भात निकम साहेबांनी स्पष्टपणे माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे. तसेच हे संपूर्ण प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालले पाहिजे अशी मागणी बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे.
हेही वाचा : चित्रा वाघ यांनी मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार; एका बलात्कार प्रकरणातील अलाहाबाद न्यायालयाने दिलेला निकाल रद्द
फास्टट्रॅक कोर्ट म्हणजे काय?
फास्टट्रॅक कोर्ट (Fast Track Court) म्हणजे गुन्ह्यांची सुनावणी आणि निकाल जलदगतीने करण्यासाठी स्थापन केलेले विशेष न्यायालय आहे. जेणेकरून गुन्हेगारांना लवकर शिक्षा मिळू शकेल आणि खटल्यांची प्रलंबित संख्या कमी होईल. फास्टट्रॅक कोर्टाचा मुख्य उद्देश गंभीर गुन्ह्यांवरील खटल्यांची सुनावणी जलदगतीने करणे आणि प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करणे आहे. ही न्यायालये राज्य सरकार आणि संबंधित उच्च न्यायालयांच्या सहकार्याने स्थापन केली जातात.
संतोष देशमुख प्रकरणात आज मोठी अपडेट समोर आली. देशमुखांच्या हत्येची आरोपींकडून कबुली देण्यात आली आहे. कबुली जबाब गोपनीय ठेवण्यात आले आहेत. देशमुखांचं अपहरण करुन हत्या केल्याची कबुली घुलेने दिली आहे. घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी देखील जबाब दिले आहेत. सुदर्शन घुले हाच टोळीप्रमुख असल्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही असा युक्तिवाद केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याने हत्येची कबुली दिली असून सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.