राज्य सरकारने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावू नये असे थेट आदेश दिले होते. असे असताना देखील फायनान्स कंपन्यांनी या आदेशालाच केराची टोपली दाखवली आहे. अकोल जिल्ह्यातील डोंगरगाव येथील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे.
डोंगरगावचे शेतकरी नागापुरे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर शेतीसाठी दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी नियमितपणे 13 हप्ते भरले देखील होते. मात्र, सध्या पाण्याअभावी शेती संकटात आल्याने पुढील हप्ते भरणे त्यांना शक्य होत नाही. असे असताना ही फायनान्स कंपनीच कर्मचारी त्यांच्या घरी येत तगादा लावत असल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर पुरावा म्हणून कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पत्नीचा फोटो काढून नेल्याचा अतिशय गंभीर आरोप नागापुरे यांनी केलेला आहे. या संपूर्ण घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.