2015 मध्ये आलेल्या ‘डॉली की डोली’ या चित्रपटात डॉली नावाची एक हुशार आणि मोहक तरुणी एका मागून एक लग्न करत श्रीमंत नवऱ्यांना लुटत असे. आता असाच काहीसा थरारक प्रकार नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये प्रत्यक्षात घडला आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
नाशिकमध्ये राहणाऱ्या विकास केसे याचं लग्न काही दिवसांपूर्वी माधुरी नावाच्या तरुणीशी झालं होतं. पण लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच माधुरी सासर सोडून गायब झाली आणि दुसऱ्याच एका तरुणासोबत लग्न केल्याची खळबळजनक माहिती समोर आली.
सासर सोडून दुसरं लग्न आणि न्यायालयात पोटगीसाठी दावा:
या धक्कादायक प्रकारानंतरही माधुरी गप्प बसली नाही. तिनं चक्क चांदवड न्यायालयात येऊन आपल्या पहिल्या नवऱ्याकडून पोटगी मागितली. विशेष म्हणजे, पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल असतानाच, माधुरीनं दुसरं लग्न केलं. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये राहणाऱ्या विकास केसे या तरुणाचे माधुरी नावाच्या एका तरुणीसोबत लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसच माधुरी सासरी राहिली. काही दिवसांनंतर माधुरी नवऱ्याला सोडून फरार झाली आणि दुसऱ्या तरुणासोबत लग्न केले.
नणंद-भावजयमध्ये थेट फ्री स्टाईल हाणामारी:
या प्रकारामुळे संतापलेली विकासची बहीण म्हणजेच माधुरीची नणंद थेट न्यायालयात धडकली. न्यायालयाच्या बाहेरच भावजय आणि नणंद यांच्यात जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाली. एकमेकींच्या झिंज्या ओढत रस्त्यावरच युद्ध सुरू झालं. लोक बघ्याची भूमिका घेत असताना, हा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला.
दोन नवरे एकाचवेळी आमनेसामने:
माधुरीसोबत तिचा दुसरा नवरा योगेश इंगळे देखील होता. भावजय-नणंदमध्ये हाणामारी झालीच, पण नंतर विकास आणि योगेश म्हणजे पहिला आणि दुसरा नवरा यांच्यातही थेट हातघाई झाली. प्रकरण इतकं तापलं की संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
व्हिडीओ झाला सोशल मीडियावर व्हायरल:
हा सगळा तमाशा कोर्टाच्या बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये शूट केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी यावर 'डॉली की डोली लाईव्ह' अशी टीका करत, हसण्यावारी घेतली आहे.