Sunday, August 17, 2025 04:01:23 PM

लाडकी बहीण योजनेमुळे मोलमजुरी करणाऱ्या महिलेला आशेचा किरण

राज्यात सध्या एकाच योजनेचा बोलबाला आहे ती म्हणजे राज्य सरकारने सुरू केलेल्या 'माझी लाडकी बहिण योजना'. या योजनेचा थेट हप्ता राज्य सरकारने हजारो महिलांच्या खात्यावर जमा केला आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे मोलमजुरी करणाऱ्या महिलेला आशेचा किरण

छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या एकाच योजनेचा बोलबाला आहे ती म्हणजे राज्य सरकारने सुरू केलेल्या 'माझी लाडकी बहिण योजना'. या योजनेचा थेट हप्ता राज्य सरकारने हजारो महिलांच्या खात्यावर जमा केला आहे. अंतरवाली खांडी गावच्या एका मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या महिलेला याचा मोठा आधार मिळाला आहे. दहा वर्षांपूर्वी मीरा घुगे यांचे पती घरात कोणाला काही न सांगता घर सोडून निघून गेले ते अद्याप  परतले नाहीत. मीरा यांना चार मुली आहेत. कुटुंबाकडे एक गुंठाही जमीन नाही अशा परिस्थितीमध्येच मीरा घुगे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी त्यांच्या तीन मुलींची लग्न केली. दिवसाला अवघी 200 रूपये मजुरी मिळत असल्याने अत्यंत हलाखीत त्या संसाराचा गाडा हाकत आहेत. 

अपार कष्ट करणाऱ्या मीरा घुगे यांनी 'लाडकी बहिण योजना' या योजनेचा अर्ज गावातीलच अंगणवाडीत भरला होता. आता त्यांना या योजनेचा लाभ सुरु होऊन मोठा आर्थिक हातभार लागल्यानं अंगणवाडी सेविकांना त्याचा आनंद आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे घरात असलेल्या अठरा विश्व दारिद्रयात संसार करणाऱ्या बहिणींचे दुःख काही प्रमाणात का होईना दूर करण्यात यश येतं आहे. 

हेही वाचा: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
 

लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी लाईफलाईन ठरली आहे. मोलमजुरी करणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना आशेचा किरण ठरली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक सहायता मिळाली आहे.  लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार लाडक्या बहीणींना दरमहा १५०० रूपयांची आर्थिक मदत करत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना सुरू झाली आहे. जुलै महिन्यापासून योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. महाराष्ट्र सर्वात जास्त गाजलेली योजना म्हणून लाडकी बहीण योजनेकडे पाहिले जाते. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून अडीच कोटी महिलांना लाभ मिळणार असल्याचेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. नुकतच महिला दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारने महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देण्यास सुरूवात केली आहे. महिलांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे. 


 


सम्बन्धित सामग्री