Tuesday, May 20, 2025 03:03:08 PM

Laxman Hake: धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं; ओबीसी नेत्याची टीका

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीदेखील नारळी सप्ताहाला उपस्थिती दर्शवली आहे. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं होतं असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं आहे.

laxman hake धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं ओबीसी नेत्याची टीका

बीड : बीड जिल्ह्यातील भगवान गडावर नारळी सप्ताह साजरा केला जात आहे. बऱ्याच राजकीय मंडळींनी या सप्ताहाला हजेरी लावली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नारळी सप्ताहाला दांडी मारली आहे. तर आमदार  सुरेश धस यांनी सप्ताहाला हजेरी लावली आहे. भगवान बाबाचा भक्त म्हणून दर्शनासाठी आलो असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीदेखील नारळी सप्ताहाला उपस्थिती दर्शवली आहे. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं होतं असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं आहे.  

'धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं' 
धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं होतं. त्यांचा आज इथली लोक सत्कार करत आहेत. ही जनभावना आहे. ज्याने ज्याने जातिवाद केला. त्यांनीच राजकीय भावनेतून बीड जिल्ह्याची बदनामी केली अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली.

हेही वाचा : 'मुंबई मेट्रो 7अ'च्या मार्गिकेचं काम वेगात सुरु, कशी असेल मेट्रो 7अ

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी नारळी सप्ताहाला भेट दिली. यावेळी आज बीडमधील लोक धनंजय मुंडे यांचा सत्कार करत आहेत. याआधी त्यांना टार्गेट केलं जात होतं. ही जनभावना समजून घेतली पाहिजे. महाराष्ट्राला सुद्धा कळली पाहिजे. ज्याने ज्याने राजकीय भावनेतून जातिवाद केला. त्यांनीच बीड जिल्ह्याची बदनामी केली. बीड जिल्ह्याचे भक्तिभाष स्वरूप महाराष्ट्राला कळू द्या अशी परखड टीका हाके यांनी केली आहे. 

'बीडचे अध्यात्म स्वरूपही महाराष्ट्राला दाखवा'
महाराष्ट्रात कित्येक दिवसापासून बीडचे वेगळं रूप आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे मीडिया ट्रायलच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी घडल्या, त्या दुर्दैवी होत्या. आज हा भक्तीचा जनसागर बघितल्यानंतर खरं तर हा बीड जिल्हा, हा विचार, ही माणसं महाराष्ट्राचा पटलावर पुढे गेली पाहिजेत असे हाके यांनी सांगितले. बीड जिल्ह्याचे अध्यात्म स्वरूपही महाराष्ट्राला दाखवा असेही यावेळी हाके यांनी म्हटले. 


सम्बन्धित सामग्री