Sunday, August 17, 2025 12:32:47 AM

वेगवेगळ्या लोन ॲपवरून नागरिकांची फसवणूक; आरोपी जेरबंद

लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळे फंडे वापरत आहेत. अशातच, पिंपरी-चिंचवड शहरात एक नवीन घोटाळा उघडकीस आला आहे.

वेगवेगळ्या लोन ॲपवरून नागरिकांची फसवणूक आरोपी जेरबंद

पिंपरी-चिंचवड: लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळे फंडे वापरत आहेत. अशातच, पिंपरी-चिंचवड शहरात एक नवीन घोटाळा उघडकीस आला आहे आणि ते म्हणजे विविध लोन अ‍ॅप्सच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबईतून अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

इसाकी राजन थेवर असं आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून एक मोबाईल फोन, पाच लॅपटॉप, सात सिम कार्ड, दोन डेबिट कार्ड असा मुद्देमाल सायबर पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच, त्याच्या लॅपटॉप मध्ये क्रेडिट कीपर, इन लोन क्रेडिट, न्यू लोन, लिगा लोन, फास्ट कॅश, हॅन्डीकॅश आणि इन्स्टंट लोन अशा प्रकारचे लोन देणारे अनधिकृत अँप आढळून आले आहेत. इसाकी राजन थेवर हा आरोपी आपल्या सिंगापूर येथील एका चायनीज व्यक्तीच्या मदतीने भारतात लोन देण्याचा गोरख धंदा चालवून नागरिकांची हजारो रुपयाची आर्थिक फसवणूक करत असल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आले आहे. आतापर्यंत पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, आरोपी इसाकी राजन थेवर आणि त्याच्या साथीदाराने देशभरातील दहा हजारांहून अधिक नागरिकांची फसवणूक केली आहे.

हेही वाचा: 'मी कोल्हापुरात शिक्षण घेतलं, मराठी शिकलो'; हिंदी-मराठी भाषावादावर काय म्हणाला आर माधवन?

'हे' आहेत सायबर हल्ल्यांपासून स्वतःचे रक्षण करण्याचे सोपे मार्ग

1 - तुमची बँक खाती, ईमेल, आरोग्य, सरकारी सेवा, सोशल मीडिया अकाउंट्सचे पासवर्ड वेळीच बदलत राहा. 

2 - जेव्हा तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये अपडेट करण्याचे नोटिफिकेशन्स येतील तेव्हा, त्याला त्वरित अपडेट करा. 

3 - 123456, 987654321, 123123, 111111 अशाप्रकारचे पासवर्ड ठेवणे टाळा. 

4 - मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा, ज्यामुळे सायबर हल्ल्यांपासून तुम्ही सुरक्षित राहाल.


सम्बन्धित सामग्री