नवी दिल्ली: 22 मे रोजी राजस्थानमधील बिकानेर येथे एका कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी 103 अमृत रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करतील. यामध्ये, 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील जिल्ह्यांमधील रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 मे रोजी एक्सवर म्हटले की, 'भारताच्या रेल्वे पायाभूत सुविधांसाठी हा एक संस्मरणीय दिवस असेल'.
हेही वाचा: 82 वर्षीय सदानंद करंदीकरांनी दिली पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 20 लाखांची देणगी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 ऑगस्ट 2023 आणि 26 फेब्रुवारी 2024 अशा दोन टप्प्याात या स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आली होती. तसेच, भारतीय रेल्वेमधील 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे 22 मे 2025 रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील आमगाव, चांदा, सावदा, शहाड, वडाळा रोड, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, परळ या स्थानकांचा समावेश आहे. मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या स्थानकांचा पुनर्विकास केवळ 15 महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण झाला. तसेच मध्य रेल्वेअंतर्गत असलेल्या 80 स्थानकांमध्ये 12 प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवासी-अनुकूल सुविधांसह ही स्थानके विकसित करण्यात आली आहेत.