Saturday, August 16, 2025 08:37:01 PM

गर्भवती महिलेने गिळली बॉलपिन

गर्भवती महिलेने गिळली बॉलपिन. डॉक्टरांनी एंडोस्कोपी करत वाचवले महिलेचे प्राण. संभाजीनगरमध्ये घडली विचित्र घटना

गर्भवती महिलेने गिळली बॉलपिन

मेकअप करताना तोंडात धरलेली बॉलपिन घशात गेल्याने गर्भवती महिलेल्या जीवावर बेतलं होतं. पण, डॉक्टरांनी प्रसंगावधान राखून उपचार केल्याने तिचे आणि बाळाचे प्राण वाचले. ही धक्कादायक घटना संभाजीनगरमध्ये घडली. वैद्यकीय तंत्रज्ञान आणि डॉक्टरांच्या कौशल्यामुळे या महिलेच्या पोटातून एंडोस्कोपी करून पिन काढण्यात आली. विशेष असे की महिला गर्भावती असल्याने पोटातील बाळाला कोणतीही इजा न करता ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे महिलेचा आणि पोटातील बाळाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.

हेही वाचा: पवारांच्या गुगलीने ठाकरे गटात अस्वस्थता

कशी घडली घटना?

सहा महिन्यांची गर्भवती महिला बाहरे जाण्याची तयारी करत होती
मेकअप झाल्यावर स्कार्फ बांधताना तिने तोंडात पिन धरली
तोंडात धरलेली बॉलपिन अचानक गिळली गेली
महिला गर्भवती असल्याने तिचा एक्स रे करणे वा सीटीस्कॅन करणे शक्य नव्हते
त्या महिलेने जेवण केलं असल्याने तिची तातडीने एंडोस्कोपी करणेही शक्य नव्हतं
पिन महिलेच्या जठरात गेल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला
मात्र, सकाळी एंडोस्कोपी करण्याशिवाय अन्य कोणता वैद्यकीय पर्याय नव्हता
सकाळी महिलेची एंडोस्कोपी करून जठरातील पिन बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश 
पिन बाहेर काढल्याने महिला आणि बाळ दोघेही सुखरूप 

हेही वाचा: पवारांनी केलेल्या शिंदेंच्या कौतुकाने राऊतांची आगपाखड

अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडतात, त्याबाबत आपण सर्वांनी वैयक्तिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महिला आणि बाळाचे प्राण वाचल्याने महिलेच्या कटटुंबियांनी डॉक्टरांचे आभार मानलेत.दैनंदिन कामकाज करताना अनेकदा आपल्याला अशा अनेक घातक सवयी असतात. तवरकरणी त्या सवयी अत्यंत साध्या वाटत असल्यातरी त्या कित्येकदा जिवावर बेतणाऱ्या असतात. त्यामुळे अशा घटनांपासून बोध घेत आपण नेहमी सजग राहण्याची नितांत आवश्यकता आहे.


 


सम्बन्धित सामग्री