पुणे आणि कोल्हापूर या दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत फक्त विशेष गाडी म्हणून धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस ही आका कायमस्वरुपी नियमित गाडी झालेली आहे. रेल्वे बोर्डाने याला मंजुरी दिलेली असून ही गाडी नव्या नंबरने मंगळवार पासून धावणार आहे.
आता नियमित दैनिक गाडी म्हणून धावणार
मिळालेल्या माहितीनुसार, ही एक्स्प्रेस पुण्याहून कोल्हापूरला जाताना 11419 आणि कोल्हापूरहून पुण्याला येत असताना 11420 या क्रमांकाने धावणार आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षण तसेच व्यवसायासाठी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांच्या आरामासाठी या गाडीला आता 18 आधुनिक एलएचबी हे डबे लावण्यातही आलेले आहेत. ज्यामध्ये एसी, स्लीपर आणि जनरल असे सर्व प्रकारचे डबे असणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षिततेसह आरामदायक होणार आहे.
हेही वाचा – मुंबईत जमिनीखाली सुरू आहे मोठं काम! 6 प्लॅटफॉर्म, 7 किमीचा बोगदा; नेमका मार्ग कुठून-कसा?
असे असेल वेळापत्रक
गाडी क्रमांक 11419 ही गाडी पुण्याहून दररोज रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी सुटेल तर सकाळी 5 वाजून 8 मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल असून परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 11420 ही कोल्हापूरहून दररोज रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी निघणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. या एक्स्प्रेसला नियमितचा दर्जा मिळाल्याने तिकीट बुकिंग आणि प्रवासाचे नियोजन करणे आता अधिक सोपे होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.