संभाजीनगर: छत्रपती संभाजी नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. 4 वर्षीय चिमुकलीची आई वडिलांनीच हत्या केल्याचं उघड झालंय. एका चार वर्षीय चिमुकलीला दत्तक घेतलेल्या आई बापानेच अंगावर चटके देऊन आणि डोक्यात मारून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आयात शेख फहिम असे आहे. फहिम शेख अय्युब, फौजिया शेख फहिम असे निर्दयी आई वडिलांचे नावे आहेत. घटनेत आरोपी असलेल्या पती पत्नी या दोन्ही आरोपींना सिल्लोड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना चार मुलं असल्यानं त्यांना मुलगी हवी म्हणून सहा महिन्या आगोदर जालन्यातून मारी आयात शेख या मुलीला दत्तक घेतले होते, मात्र, बुधवारी रात्री पती पत्नी यांनी संगनमत करून मुलीला अंगावर चटके देऊन आणि डोक्यात टणक वस्तूने मारून टाकल्याचा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचा: वकिलांनी कोरटकरवर केला हल्ला
याबाबत अधिक माहिती अशी की, चार वर्षीय मुलीला दत्तक घेतलेल्या आई वडिलांकडून का ठार मारण्यात आल्याने याचा तपास पोलीस करीत आहे. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबू मुंढे करीत आहे.
मयत आयात या मुलीला तिचे वडील शेख नसीम अब्दुल कय्युम याने आरोपी शेख फहिम यास पाच हजार रुपयात विकली होती असे आरोपी याचे म्हणणे असून यात जाफराबाद येथील एक इसम मध्यस्ती असल्याचे सांगत मुलीला विकत घेतल्याचे लेखी कागदपत्रे देखील माझ्याकडे असल्याचे आरोपीने सांगितले. मात्र मुलीला का ठार मारले हे त्याने सांगितले नाही. मुलीला का मारले हे पोलीस तपासात लवकरच निष्पन्न होणार असून याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.