Sunday, August 17, 2025 04:02:26 PM

एकनाथ शिंदेंना पुरस्कार देणं म्हणजे अमित शहा यांना पुरस्कार दिल्यासारखं आहे; संजय राऊत यांची शरद पवारांवर टीका

ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसून गद्दारी केली. शिवसेनेचे तुकडे तुकडे केले, त्यांच्या सत्कार करणे कदापिही शिवसेनेला सहन होणार नाही, अशा तीव्र शब्दांत संजय राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदेंना पुरस्कार देणं म्हणजे अमित शहा यांना पुरस्कार दिल्यासारखं आहे संजय राऊत यांची शरद पवारांवर टीका
Sanjay Raut criticizes Sharad Pawar
Edited Image

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. यावरून राजकीय चर्चेना उधाण आले आहे. त्यातच आता शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. या कार्यक्रमाला शरद पवारांनी जाणं टाळलं पाहिजे होते. आम्हाला पण राजकारण कळते. शिंदेंना पुरस्कार देणे म्हणजे अमित शहा यांना पुरस्कार दिल्यासारखे आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसून गद्दारी केली. शिवसेनेचे तुकडे तुकडे केले, त्यांच्या सत्कार करणे कदापिही शिवसेनेला सहन होणार नाही, अशा तीव्र शब्दांत संजय राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

शरद पवार यांच्याकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक - 

गेल्या अनेक वर्षांपासून संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होत असते. परंतु, दिल्लीच्या कार्यक्रमांमध्ये महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना म्हटले की, नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदे यांचे नाव समोर येते. ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी योग्य दिशा देण्याचे काम केले. कधीही पक्षीय अभिनवेश मनात न ठेवता सर्व पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली. याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चित होईल, अशा शब्दांत शरद पवार यांनी 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदेंना त्यांच्या कामाती पोचपावती दिली. 

हेही वाचा - Sharad Pawar : शरद पवारांनी केलं एकनाथ शिंदेंच कौतूक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मात्र, आता यावरून संजय राऊत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी या कार्यक्रमाला जाणे कटाक्षाने टाळायला हवे होते. एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि नवी मुंबईच्या काय विकास केलाय हे आपल्याला सांगता येईल. परंतु, दिल्लीतील साहित्य संमेलन नसून राजकीय दलाली आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा - सावंतांच्या मुलाने एका ट्रीपसाठी दिले तब्बल 68 लाख

दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीकडून महाविकास आघाडीला दारूण पराभव पत्करावा लागला होता. तथापी, आता उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीत एकटे लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत एकमत नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.  
 


सम्बन्धित सामग्री