छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज जलील आणि संजय शिरसाट वाद पाहायला मिळत आहे. जलील सातत्याने शिरसाटांवर आरोप करत आहेत. आता त्यांनी नवीन आरोप केले आहेत. शिरसाटांची पत्नी आणि मुलांच्या नावे सरकारी जमीन आहेत. एकूण 12 हजार स्क्वेअर फुटाची जागा शिरसाटांनी लाटली असा सणसणीत आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. यामुळे शिरसाट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
शिरसाटांवर गंभीर आरोप
जलील यांनी शिरसाटांवर गंभीर आरोप केले आहेत. शेतकऱ्यांच्या जागेवर डल्ला मारला. 10 एकर जागा नियम डावलून मुलाच्या नावावर केली. तसेच 30 कोटींची जागा केवळ 1 कोटी 10 लाखांना घेतली असे जलील यांनी म्हटले आहे. उच्चस्तरीय समितीकडून शिरसाटांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आयकर, ईडी का शांत?, एसीबी का कारवाई करत नाही? असा सवालही जलील यांनी केले आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकपणाची परीक्षा असल्याचे जलील यांनी म्हटले.
हेही वाचा : 'आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगातच अँप्रेन्टीसशिप मिळणार'
जलील यांनी शिरसाटांवर केलेले आरोप
आरोप -1
शाजापूरमध्ये 30 कोटींची जागा अवघ्या 1 कोटीला घेतली. हरिजन समाजाची जमीन लाटली.
आरोप - 2
छत्रपती संभाजीनगर, जालना रोडवर भूखंड खरेदी केला. 12 हजार स्क्वे.फूट जागा केवळ 5.83 कोटीला खरेदी केला. 4800 रू. प्रति स्क्वे. फूट दराने खरेदी केला.
आरोप - 3
शाजापूरमध्ये भूखंड लाटला. 2 गुंठे जागा 1.50 कोटीत खरेदी केली. त्याच्याच शेजारचा भूखंड अवघ्या 50 लाखांना खरेदी केला.
आरोप - 4
व्हिट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेत गैरप्रकार 110 कोटींचं हॉटेल 67 कोटींना खरेदीचा प्रयत्न केला. शिरसाटांचे 5 पार्टनर्स अद्याप समोर आलेले नाहीत.
आरोप - 5
शेंद्रा एमआयडीसीतील भूखंड लाटला.106 कोटींची जमीन हडपली. जमीन खरेदीसाठी आरक्षणात फेरफार केला.
आरोप - 6
नाशिकमध्ये पंचतारांकित हॉटेलचं काम सुरू आहे.