Sunday, August 17, 2025 04:01:27 PM

Sharad Pawar : शरद पवारांनी केलं एकनाथ शिंदेंच कौतूक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शरद पवार यांनी कौतूक केलं आहे. एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी कौतूक केलं.

sharad pawar  शरद पवारांनी केलं एकनाथ शिंदेंच कौतूक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Sharad Pawar : शरद पवरांनी केलं एकनाथ शिंदेंच कौतूक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतूक केलं आहे. एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये हा सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचा सत्कार होत आहे, याचा मला आनंद आहे. महाराष्ट्राला साताऱ्याने अनेक मुख्यमंत्री दिले. त्यात एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश आहे. आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री धनजीभाई कूपर हे साताऱ्याचे होते. साताऱ्यात कूपर नावाची एक कंपनी होती. त्याचे मालक ते मालक होते.”  

हेही वाचा - सावंतांच्या मुलाने एका ट्रीपसाठी दिले तब्बल 68 लाख

मी देखील साताऱ्याच्या - शरद पवार 

यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण त्यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे झाले. मला त्यांना आठवण करून द्यायचीये, तुमची यादी बरोबर आहे. पण एक नाव त्यामध्ये राहिले आहे. त्या गावाचे नाव नांदवळ आणि त्या गावच्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे शरद पवार, असे म्हणत पवारांनी आपणही साताऱ्याचे असल्याचं सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व केले. ठाणे, नवी मुंबई, मुंबई या नागरी भागातील समस्यांची जाण असलेले ते प्रभावी नेते आहेत. त्यांनी सातत्याने योग्य दिशा देण्याचे काम केले. एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या नागरी प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. विविध क्षेत्रांतील लोकांशी सुसंवाद साधत त्यांनी प्रशासन चालवले. त्यामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.”

हेही वाचा - Cabinet decision: जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनसाठी 438 कोटींची मान्यता

 

साहित्य संमेलन दिल्लीत होत असल्याबद्दल पवारांनी आनंद व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते. त्याला पंडीत जवाहरलाल नेहरू आले होते. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. अशी आठवणही यावेळी त्यांनी सांगितली. दरम्यान, शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचे कौतूक केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.


सम्बन्धित सामग्री