Kunal Kamra Controversy: स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. शिंदे गट शिवसैनिकांनी मुंबईतील खार परिसरातील कामरा यांच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच ज्या हॉटेलमध्ये विनोदी कलाकाराने व्हिडिओ शूट केला होता त्या हॉटेलवरही हल्ला केला होता. खार येथील द हॅबिटॅटच्या परिसरात झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल राहूल एन कनाल यांच्यासह शिवसेनेच्या युवा शाखेचे सरचिटणीस आणि इतर 19 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सोमवारी राहुल कनाल यांना खार पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले. पण काही वेळाने ते स्टेशनबाहेर आले. त्यानंतर त्यांना पुन्हा 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, खार पोलिसांनी तोडफोड प्रकरणात एकूण 19 जणांची नावे नोंदवली आहेत.
हेही वाचा - Nagpur: संचारबंदी हटवली; पोलीस बंदोबस्त कायम
काय आहे नेमकं प्रकरण?
कुणाल कामरा यांनी त्याच्या कॉमेडी शो दरम्यान महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांवर अश्लील गाणी गायल्याचा आरोप आहे. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आणि त्यांनी खार येथील कामरा यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. या संपूर्ण घटनेनंतर सोशल मीडियावरही या मुद्द्यावरील चर्चा तीव्र झाली आहे. काही लोक याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला म्हणत आहेत, तर काही लोक विनोदालाही मर्यादा असायला हवी, असं म्हणत आहेत.
हेही वाचा - नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची तयारीत सुरू; महाकुंभाच्या धर्तीवर निष्पक्ष प्राधिकरण स्थापन करण्यात येणार
कामरा यांनी 'दिल तो पागल है' चित्रपटातील एका हिंदी गाण्याच्या धर्तीवर एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आणि त्यांना 'देशद्रोही' म्हटले. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कामरा यांनी शिंदे यांच्याविरुद्ध केलेल्या टीकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते हॉटेलच्या सभागृहात पोहोचले आणि त्यांनी कामरा यांचे गाणे ज्या ठिकाणी शूट करण्यात आले तेथे तोडफोड केली.