Sunday, August 17, 2025 04:28:42 PM

नव्याने उभारलेला पुतळा 100 वर्ष टिकणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण

मालवण येथील ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोजकोट किल्ल्यावर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.

नव्याने उभारलेला पुतळा 100 वर्ष टिकणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण

सिंधुदुर्ग: मालवण येथील ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोजकोट किल्ल्यावर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या भव्य सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्य मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि नितेश राणे देखील उपस्थित होते.

राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच स्वाभिमानाने आणि अधिक भव्यतेने उभारला आहे. मागच्या काळात ज्यावेळी दुर्दैवी घटना घडली होती, त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी आम्ही पुन्हा प्रस्थापित करू. आज त्याचे पूजन आम्ही केले आहे. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो'.

हेही वाचा: 'संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा'; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी

'सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण असतील किंवा विद्यमान मंत्री शिवेंद्र भोसले असतील, त्यांनी हे काम अतिशय वेगाने केले आहे. यासोबतच सुतार साहेबांनीही उत्तम प्रकारे शिवरायांचा पुतळा तयार केला आहे. त्यांच्यासोबत आयआयटीचे विद्यार्थी आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थीही उपस्थित होते. कोकणमध्ये वेगवेगळे वादळ येतात. त्या सर्व वादळांचा अभ्यास करूनच या पुतळ्याची रचना करण्यात आली आहे. शिवरायांचा हा पुतळा जवळपास 91 फूटांचा असून त्यात 10 फूट पेडेस्ट्रॉल आहे. याकडे 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा भारतातील सर्वांत मोठा पुतळा' म्हणून पाहता येईल. किमान 100 वर्ष तो कोणत्याही वातावरणात टिकेल. तसेच, पुतळा तयार करणाऱ्यांना 10 वर्षे या पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी देण्यात आली आहे. मागील काळात जी दुर्दैवी घटना घडली होती, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत महाराजांचे स्मारक बांधले जाईल असा आमचा निर्धार होता'.

हेही वाचा: चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची अजित डोवालांसोबत फोनवर चर्चा

गेल्या वर्षी योग्य प्रकारे देखभाल न केल्यामुळे शिवरायांचा पुतळा कोसळला होता. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. यासोबतच या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले. अयोग्य देखभाल, गंज आणि सदोष वेल्डिंगमुळे पुतळा कोसळला, ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या प्रकरणाबद्दल माफी मागितली. त्यामुळे नव्या पुतळ्याची उभारणी भावनिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.


सम्बन्धित सामग्री